तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध:उद्यापासून राज्यात लागू होणार
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : राज्यात कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंट्समुळे 4 ते 6 आठवड्यांत तिसरी लाट पसरण्याची दाट शक्यता आहे. हा धोका लक्षात घेता संपूर्ण राज्यात किमान तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू राहतील. 4 जूनला अनलॉकबाबत 5 टप्पेनिहाय नियमावली जारी करण्यात आली होती. त्यातील तिसऱ्या टप्याचे निर्बंध राज्यात लागू राहतील. उद्यापासून हे नवीन निर्बंध लागू राहणार आहेत.
मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी प्रतिबंधात्मक सूचनांबाबतचे आदेश जारी केले. यानुसार सर्व प्रशासकीय क्षेत्रांत साप्ताहिक पॉझिटिव्हिटी निर्देशांक व ऑक्सिजन सुविधायुक्त खाटांची टक्केवारी कितीही असली तरी त्यांनी बंधनांचा स्तर, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्यांकडून स्पष्ट आदेशान्वये जोवर बंधने मागे घेतली जात नाहीत तोवर तिसऱ्या स्तराइतका ठेवावा.
जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम निर्णयाचे अधिकार असतील. निर्बंधात घट-किंवा वाढ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आठवड्याचा आरटीपीसीआर टेस्टचा पॉझिटिव्हिटी रेट लक्षात घ्यावा लागेल.
४ जूनच्या आदेशामधील तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध असे
- अत्यावश्यक दुकाने व सेवा रोज सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत खुली राहतील.
- मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील.
- सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ पर्यंत खुली राहतील. त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार रविवार बंद राहील.
- माॅर्निंग वॉक, मैदाने, सायकलिंगला पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत मुभा असेल.
- खासगी आणि शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू असतील.
- लग्नसोहळ्यांना ५० लाेकांची, तर अंत्यविधीला २० लोकांची मर्यादा असेल.
- ई-कॉमर्स दुपारी २ पर्यंत सुरू असेल.
- जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहणार आहे.
- डेल्टा प्लस व तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे नियमांत केला बदल
- इतर दुकाने सकाळी ७ ते ४ पर्यंत खुली, शनिवार-रविवार मात्र बंद
Mumbai Lakshadeep