दैनंदिन नवीन रुग्णांची संख्या 2 लाखांपेक्षा कमी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, 25 मे (हिं.स) प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत कोविड --19 विरुद्ध भारताच्या लढाईत दैनंदिन नवीन रुग्णांची संख्या 40 दिवसानंतर 2 लाखांपेक्षा कमी झाली आहे. 14 एप्रिल रोजी दैनंदिन रुग्णांची नोंद 1,84,372 होती. गेल्या 24 तासांत 1,96,427 नवीन रुग्ण आढळले.
उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या देखील आता 25,86,782 पर्यंत कमी झाली आहे. 10 मे रोजी उपचाराधीन रुग्णांची संख्या सर्वोच्च पातळीवर होती ती आता कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत 1,33,934 ची घट झाली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या आता देशातील एकूण बाधित रुग्णांच्या 9.60% आहे.
सलग 12 व्या दिवशी देशात बरे झालेल्या दैनंदिन रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा अधिक आहे. गेल्या 24 तासांत 3,26,850 रुग्ण बरे झाले. भारतातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 2,40,54,861 वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 89.26 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
गेल्या 24 तासात देशात एकूण 20,58,112 चाचण्या घेण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण 33,25,94,176 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दैनंदिन पॉसिटिव्हीटी दर कमी झाला आहे आणि आज तो 9.54% आहे.
सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 19,85,38,999 लसींच्या मात्रा 28,41,151 सत्रांद्वारे देण्यात आल्या आहेत. यामध्ये 97,79,304 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा), 67,18,723 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा), 1,50,79,964 आघाडीवर काम करणारे कर्मचारी (पहिली मात्रा), 83,55,982 आघाडीवर काम करणारे कर्मचारी (दुसरी मात्रा ), 18-44 वयोगटातील 1,19,11,759 लाभार्थी (पहिली मात्रा), 45 ते 60 वयोगटातील 6,15,48,484 (पहिली मात्रा) आणि 99,15,278 (दुसरी मात्रा ) तर 60 वर्षांवरील 5,69,15,863 व्यक्तींना पहिली मात्रा तर, 1,83,13,642 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली. मागील 24 तासात 18-44 वयोगटासाठी लसीच्या 12.82 लाख मात्रा देण्यात आल्या. 1 मे पासून व्यापक आणि वेगवान राष्ट्रीय कोविड -19 लसीकरण धोरण राबवल्यापासून ही सर्वाधिक संख्या आहे.
Mumbai Lakshadeep