बिग बॉस मराठी ३: मोमोने शेअर केला जुन्या भांडणाचा ‘तो’ किस्सा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली असून टास्कमुळे स्पर्धाकांमध्ये टक्कर देखील सुरु झाल्याचं चित्र पाहायाला मिळतंय. किचनमध्ये जेवणावरून वाद सुरु झाले आहेत, तर टास्कमध्ये स्पर्धा पाहायला मिळतेय. या शोमधील अभिनेत्री मीरा जगन्नाथने देखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नुकताच या शोचा नवा प्रोमो रिलीज झाला असून यात मोमो म्हणजेच अभिनेत्री मीरा जगन्नाथने सुरेखा कुडची यांच्यासोबत एका सेटवर भांडण झाल्याचा किस्सा शेअर केला. हा जुना किस्सा ऐकून सुरेखा देखील थक्क झाल्याचं पाहायला मिळालं.
या प्रोमोमध्ये डायनिंग टेबलवर काही स्पर्धक गप्पा मारत बसल्याचं दिसून येत आहे. यावेळी मीराने सुरेखा कुडची यांना त्यांच्यासोबत एका शोमध्ये एकत्र काम केल्याचं सांगितलं. काही वर्षांपूर्वी मीराने सुरेखा कुडची यांच्यासोबत ‘नकळत सारे घडले’या मालिकेत काम केल्याची आठवण करून दिली. हे ऐकून सुरेखादेखील थक्क झाल्या. यावेळी मीराने त्यांना या शोमध्ये तिने साकारलेल्या भूमिकेची आठवण करून दिली. मात्र हे सांगत असतानाच मीराने त्यावेळी सुरेखा कुडची यांनी मीरासोबत भांडण केलं होतं याची आठवण करून दिली. सुरेखा यांना या गोष्टीचा विसर पडला असल्याने हे ऐकून त्यादेखील हैराण झाल्या. त्यावेळी मालिकेच्या सेटवर मीरासोबत सुरेखा कुडची असं काही वागल्या होत्या की ज्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सुरेखा कुडची यांना पाहताच मीराच्या मनात अनेक प्रश्न आल्याचं ती म्हणाली, “तिथे आपलं ही काही झालं होतं….तुम्ही इथे आलात तेव्हा मला वाटलं बापरे या इथेही अशा वागणार आहेत का? पण तुम्ही इथे वेगळ्याच वाटतं आहात. तुमच्याकडे पाहून पॉझिटिव्ह वाईब्स वाटताय. या त्याच आहेत का असा मला प्रश्न पडला? ” असं मीरा म्हणाली. यावर सुरेखा कुडची यांनी तेव्हा काय घडलं होतं हे मीराला विचारलं. यावर मीरा म्हणाली, “तुम्ही माझी बॅग फेकून दिली होती.” मीराचं हे उत्तर ऐकून सुरेखा कुडची देखील थक्क झाल्या.
Mumbai Lakshadeep