मराठमोळी सई 'नवरसा' सीरिजमधून तामिळी प्रेक्षकांना घालणार भुरळ
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
 
                                मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. काही दिवसांपूर्वी मीमी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर आता ती नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘नवरसा’ या तामिळ सीरिजमध्ये आघाडीच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.
‘नवरसा’ या सीरिजचे दिग्दर्शन आणि निर्मिती ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांनी केले आहे. या वेब सीरीजमध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि अभिनेत्री असणार आहेत. काही दिवसांपूर्वी या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सई तामिळ अभिनेता विजय सेतुपथीसोबत दिसत आहे. विजय सेतुपतीला या आधी आपण ‘मास्टर’ या चित्रपटात पाहिले होते. सईने हा फोटो शेअर करत तामिळमध्ये कॅप्शन दिल्याने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
काय आहे नवरसा आणि त्या मागील उद्देश
‘नव’ म्हणजे ९ आणि ‘रसा’ म्हणजे मानवी भावना अर्थात राग, करुणा, धैर्य, द्वेष, भीती, हशा, प्रेम, शांती आणि आश्चर्य. मणिरत्नम यांच्या या नव्या प्रयोगात ‘नवरसा’मध्ये मानवाच्या या नऊ भावनांवर प्रकाश टाकला जाणार आहे. ९ जुलै रोजी नेटफ्लिक्सने या प्रोजेक्टचा टीझर प्रदर्शित केला होता. या व्हिडिओमध्ये सूर्या, सिद्धार्थ, प्रकाश राज, विजय सेतुपति, रेवती, ऐश्वर्या राजेश आदी कलाकार दिसले. विशेष म्हणजे या माध्यमातून मिळणारी कमाई मनोरंजन विश्वातील गरजू तंत्रज्ञांना दिली जाणार आहे.
 
                         Mumbai Lakshadeep
                                    Mumbai Lakshadeep                                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
            