गेल्या 24 तासात 44, 230 नवे कोरोना रुग्ण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत भारतात 44 हजार 230 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 42 हजार 360 रुग्णांनी विषाणूवर मात केली आहे. गुरुवारी देशात 555 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 15 लाख 72 हजार 344 इतकी आहे, तर 3 कोटी 07 लाख 43 हजार 972 नागरिकांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. देशातील एकूण कोरोना मृत्यूचा आकडा 4 लाख 05 हजार 155 वर पोहोचला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाख 05 हजार 155 इतकी आहे. देशातील केरळ राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.गेल्या दीड वर्षांपासून जगावर कोरोना महामारीचं संकट घोंघावत आहे. असा कोणताही देश नाही ज्याला या विषाणूची झळ पोहोचलेली नाही. विषाणूवर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशातील आतापर्यंत 45 कोटी 60 लाख 33 हजार 754 लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस मिळाला आहे.