तारक मेहता का उल्टा चष्मा:दिव्यांका त्रिपाठीने दयाबेनची भूमिका करण्यास दिला नकार?
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने प्रेक्षकांच्या मनावर आजवर राज्य केलं आहे. 'बनू मैं तेरी दुल्हन', 'ये है मोहोबत्तें' या हिंदी टेलिव्हीजन सिरीयलमुळे तीला प्रसिद्धी मिळाली तसेच लोकांच्या घराघरात पोचली. नुकतच समोर आलेल्या माहीतीनुसार 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील प्रसिद्ध भूमिका दयाबेन हे पात्र साकारण्याची ऑफर आधी दिव्यांकाला मिळाली होती. कोईमोई च्या वृत्तानुसार सब टिव्हीवरिला फेमस मालिका 'तारक मेहताका उल्टा चष्मा' मध्ये दिंव्याकाला काम करण्याची संधी मिळली होती. पण तिने हि संधी धुडकावून लावल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताबाबत अद्याप दिव्यांकाने दुजोरा दिला नाहीये तसेच दिव्यांकाकडून काही अधिकृत माहिती समोर आली नाहिये. सध्या या लोकप्रिय मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीने तिच्या अभिनयाने भुमिकेला चार चाँद लावले होते इतकेच नाही तर गेल्या काही वर्षापासून दिशा मालिकेत पुन्हा कधी येणार? असे प्रश्न करुन चाहत्यांनी शोच्या मेकर्सला भांबावून सोडले आहे.चाहत्यामध्ये दयाबेनची प्रचंड क्रेझ आहे.
Mumbai Lakshadeep