दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीचे क्षेत्र निवडून यशस्वी व्हावे...आनंदी जीवन जगावे अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला असून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. कोरोना संकटामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्षाहून अधिक काळ तणावाखाली वावरावे लागले. तरीही शाळातंर्गत मुल्यांकनात विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली. कोकण विभागाचा निकाल शंभर टक्के तर अन्य विभागांचा निकाल ९९ टक्क्याहून अधिक लागला आहे. राज्यातील ९९.९५ टक्के विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. हे यश कौतुकास्पद असून त्याबद्दल विद्यार्थी, शिक्षक, पालकांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
जीवनात येणाऱ्या आव्हानांवर मात करुन हे विद्यार्थी प्रत्येक टप्प्यावर असंच यश मिळवतील, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहावी उत्तीर्ण विद्यार्थी, पालक व त्यांच्या शिक्षकांचे अभिनंदन करुन त्यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.
Mumbai Lakshadeep